सत्तेची खेळी – Animal Farm या जॉर्ज ऑरवेल लिखित गाजेलेल्या कादंबरीचा स्वैर अनुवाद.
- Brand: Dhananjay Gokhale
- Availability: In Stock
Description
बदल हा स्वाभाविक आहे आणि तो क्षणोक्षणी घडत असतो. कुठलंही नेतृत्व
याला अपवाद नाही. सामान्यांपासून सत्ताधीशांपर्यंत प्रत्येकजण बदल घडवण्याचा
प्रयत्न करत असतो. प्रत्येक संस्थेमध्ये आपणाला हे दिसतं. परंतु नेतृत्व जरी बदलले
किंवा बदलवले गेले तरी सामान्यांच्या परिस्थितीत मात्र फारसा बदल घडून येत नाही.
हे मार्मिक सत्यच मनाला भुरळ घालून जातं. या कादंबरीतील पात्रं आसपास दिसतात.
आपल्या रोजच्या जीवनातही गल्ली ते दिल्लीपर्यंत हे 'अॅनिमल फार्म' किंवा ही ‘सत्तेची खेळी’ सर्वत्र
दिसून येते. या रुपकातून आजूबाजूच्या माणसांचं आणि स्वतःचंही निरीक्षण करण्यात मजा
येते. जॉर्ज ऑरवेलच्या 'अॅनिमल फार्म' या
मूळ इंग्रजी कादंबरीचा ‘सत्तेची खेळी’ हा
स्वैर अनुवाद; आपल्या आजूबाजूची परिस्थिती पहात याचा आनंद आस्वाद घ्या!
लेखकाबद्दल:
धनंजय गोखले - प्रकल्प व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये गेली २२ वर्ष देशात आणि
परदेशात नाव. ABI, USA (अमेरिकन बायोग्रफिकल इंस्टीटयूट) तर्फे प्रकल्प
व्यवस्थापन याक्षेत्रात शिक्षणाबाबत केलेल्या कामाबद्दल Man of the year-2012 पुरस्कार. PMI, USA (प्रोजेक्ट मॅनेजमेंट इंस्टीटयूट) तर्फे अत्यंत मानाचा
समजला जाणारा एरिक जेनेट – Excellence in PM: 2013 पुरस्कार. प्रकल्प व्यवस्थापनातील सूत्र नाविन्यपूर्ण पद्धतीने समाजापर्यंत
पोचवण्याच्या कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. Australian Psychologists Press या संस्थेतून ‘व्यक्तिमत्वांचे
प्रकार आणि त्या अनुषंगाने होणारी मनुष्याची जडणघडण’ या विषयावरील मार्गदर्शन. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन
उपक्रमासाठी भारत सरकारच्या - मानव संसाधन मंत्रालयातर्फे प्रकल्प
व्यवस्थापनाच्या कार्यशाळेसाठी निमंत्रण. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतामध्ये
आवड. गेली १३ वर्षे हार्मोनिअम वादनाचा छंद. प्रकल्प व्यवस्थापन
या विषयामध्ये “नाटक” या पद्धतीचा खुबीने वापर. व्यवस्थापन क्षेत्र तसेच ललित लेखनातील एकूण ८
पुस्तके प्रकाशित! www.dgonline.in
Abridged Guide to PMBOK
Wonderland of PMO
Assessing and developing PM competencies - A Case!
Ladder of Wisdom
Dialogue with self - A journey to happiness!
एक तरी ऋचा अंगीकारावी - एक
स्वसंवाद!
गोष्ट भगवद्गीतेची, तुमची, माझी!