Mountain View

सत्तेची खेळी – Animal Farm या जॉर्ज ऑरवेल लिखित गाजेलेल्या कादंबरीचा स्वैर अनुवाद.


₹ 200.00

Description

बदल हा स्वाभाविक आहे. क्षणोक्षणी बदल घडत असतो. सत्ता किंवा नेतृत्व ही याला अपवाद नाही. सामान्यांपासून सत्ताधीशांपर्यंत प्रत्येकजण या ना त्याप्रकारे या ना त्या गोष्टीत बदल घडविण्याचा प्रयत्न करत असतो. बदल होतोही. परंतु नेतृत्व जरी बदलले तरी सामान्यांच्या परिस्थितीत मात्र फारसा बदल घडून येत नाही हे एक सत्य आकर्षक पद्धतीने या पुस्तकामध्ये मांडलं आहे.
६५ वर्षांनंतरसुद्धा हे पुस्तक सद्य परिस्थितीत अत्यंत चपखल आहे. कथानकातील सर्व पात्री यात प्राण्यांच्या रूपात वावरत असली तरी ती मानवी प्रवृत्तींचे, स्वभावाचे नमुने म्हणूनच आपल्यासमोर येतात. जनतेचे नेतृत्व करायला आपणच काय ते लायक आहोत हा हास्यास्पद ठाम विश्वास, एकमेकांची सत्ता उलथण्याचे डावपेच, लाचलुचपत, भ्रष्टाचार, वरिष्ठांची हांजीहांजी अशी उदाहरणे आपल्याला जागोजागी दिसतात. त्याचं खूप सुंदर वर्णन या कादंबरीत पाहायला मिळत. कुठल्याही संस्थेमध्ये बॉक्सर, स्क्वीलर, बेन्जामिन, दिसतात.

Reviews (0)

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good
Mountain View