Description
गीतेमधील संवादाकडे आपण दुर्लक्ष करतो, तेव्हा खरं तर आपण आपल्याकडेच दुर्लक्ष करतो. अर्जुनाचे प्रश्न आपलेच आहेत हे उमजत नाही आणि मग श्रीकृष्णाची उत्तरं सुद्धा आपली रहात नाहीत. जगावं कसं हे सांगणारं पुस्तक जगण्यापासून लांब जातं. या सगळ्यामुळे व्यासांचं, कृष्णाचं, किंवा अर्जुनाचं नाही तर आपलं नुकसान झालंय. बिगरी ते मॅट्रिक या कथनात पु.ल.म्हणतात की 'मला कर्ता आला, कर्म आलं पण इंग्रजी आलं नाही'. तसंच ‘मला सगळ्या अध्यायांची नावं पाठ झाली, श्लोक पाठ झाले, पण गीतेमधली गम्मत काही कळली नाही.’ असं नको ना व्हायला? तर मग कॉफीशॉपमध्ये चाललेल्या दोन मित्रांच्या हृद्य गप्पांसारखा हा संवाद अनुभवुया. प्रश्न विचारण्याची अर्जुनाची चिकाटी आणि उत्तरं देण्याची कृष्णाची हातोटी यांनी सजलेलं हे आनंददायी नाट्य आहे. घोकंपट्टीचं संवादात, गंभीरतेचं आनंदात, आणि दांभिक चर्चांचं प्रामाणिक प्रयत्नात रूपांतर करूया. त्यासाठी हे पुस्तक नक्की मदत करेल. You can pay and buy this AV book online using international currency : https://vimeo.com/ondemand/gbgb