अथर्वशीर्ष - एक स्वसंवाद! - Online (Stream and Download)
- Brand: Dhananjay Gokhale
- Availability: In Stock
Description
अथर्वशीर्ष - एक स्वसंवाद! A dialog with self - with the power of subconscious mind
हे भाषण गणपती अथर्वशीर्षाचा “मला जाणवलेला” अर्थ तुमच्यापर्यंत पोचवावा म्हणून! यामध्ये शब्द-न्-शब्द याचा अर्थ ना सांगता ओळींचा (ऋचांचा) भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्या ऋचा नाही तर मला ज्यांचा अर्थ जाणवला आणि पटला त्या आहेत. खरं तर मला स्वतःला त्या “सहस्त्रावर्तना”चा भयंकर तिटकारा आहे. आमच्या घरी कधीही हा प्रकार माझ्या आजोबांनी होऊ दिला नाही. ते म्हणायचे की एकदाच म्हणा पण शांत, आनंदाने, शब्दांची, अर्थाची मजा घेत म्हणा. एकदा म्हटल्यावर वाटलं की अजून एकदा म्हणावं तर पुन्हा म्हणा! पण वाघ मागे लागल्यासारखा, गणपतीबरोबर हमरी-तुमरी केल्यासारखं, कोणावर तरी उपकार केल्यासारखं नका म्हणू. कदाचित याचं संस्कारांनी असेल, पण जेंव्हा मी ते म्हणायचो तेंव्हा मजा घेत म्हणायचो. गेली काही वर्षे – ३- ४ वर्षं झाली असतिल, या मजेबरोबरच मला काही अर्थ जाणवू लागला.वेदाच्या दृष्टीने तो बरोबर की चूक माहित नाही. पण कुठेतरी शांतता लाभायला लागली. आपण सगळे मिळून यास्वसंवादाचा चा आनंद घेऊया.
** You will get the access link & procedure on your registered email id in 24 hours after receiving payment.