Mountain View

गणपती अथर्वशीर्ष (DVD)


₹ 450.00

Description

हे भाषण गणपती अथर्वशीर्षाचा मला जाणवलेलाअर्थ तुमच्यापर्यंत पोचवावा म्हणून! यामध्ये शब्द-न्-शब्द याचा अर्थ ना सांगता ओळींचा (ऋचांचा) भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्या ऋचा नाही तर मला ज्यांचा अर्थ जाणवला आणि पटला त्या आहेत. खरं तर मला स्वतःला त्या सहस्त्रावर्तनाचा भयंकर तिटकारा आहे. आमच्या घरी कधीही हा प्रकार माझ्या आजोबांनी होऊ दिला नाही. ते म्हणायचे की एकदाच म्हणा पण शांत, आनंदाने, शब्दांची, अर्थाची मजा घेत म्हणा. एकदा म्हटल्यावर वाटलं की अजून एकदा म्हणावं तर पुन्हा म्हणा! पण वाघ मागे लागल्यासारखा, गणपतीबरोबर हमरी-तुमरी केल्यासारखं, कोणावर तरी उपकार केल्यासारखं नका म्हणू. कदाचित याचं संस्कारांनी असेल, पण जेंव्हा मी ते म्हणायचो तेंव्हा मजा घेत म्हणायचोगेली काही वर्षे - ४ वर्षं झाली असतिल, या मजेबरोबरच मला काही अर्थ जाणवू लागला. वेदाच्या दृष्टीने तो बरोबर की चूक माहित नाही. पण कुठेतरी शांतता लाभायला लागली. आपण सगळे मिळून या स्वसंवादाचा चा आनंद घेऊया.
लेखकाबद्दल: धनंजय गोखले - प्रकल्प व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये गेली १६ वर्ष देशात आणि परदेशात नाव. ABI (अमेरिकन बायोग्रफिकल इंस्टीटयूट) तर्फे प्रकल्प व्यवस्थापन याक्षेत्रात शिक्षणाबाबत केलेल्या कामाबद्दल “Man of the year-2012” पुरस्कार. PMI (प्रोजेक्ट म्यानेजमेंट इंस्टीटयूट) तर्फे अत्यंत मानाचा समजला जाणारा एरिक जेनेट – Excellence in PM: 2013” पुरस्कार. प्रकल्प व्यवस्थापनातील सूत्रांचे अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धतीने समाजापर्यंत पोचवण्याच्या कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. Australian Psychologists Press या संस्थेतून व्यक्तिमत्वांचे प्रकार आणि त्या अनुषंगाने होणारी मनुष्याची जडणघडणया विषयातील शिक्षण आणि त्यावरील मार्गदर्शन. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतामध्ये आवड आणि गेली १३ वर्षे हर्मोनिअम वादनाचा छंद. प्रकल्प व्यवस्थापन या विषयामध्ये नाटकया पद्धतीचा खुबीने वापर
 
2 PDUs 

Reviews (0)

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good
Mountain View